गणेश तांबे यांची पोस्टर स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड


स्थैर्य, फलटण : नवीन शैक्षणिक धोरण सन २०२० शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धेचा तालकास्तरीय निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये बिबी केंद्रातील जि.प.शाळा कारंडेवस्तीचे उपशिक्षक गणेश भगवान तांबे यांचा पोस्टर स्पर्धेमध्ये प्रौढ शिक्षण या विषयांमध्ये फलटण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. गणेश तांबे हे उपक्रमशील शिक्षक आहेत. नुकताच सातारा जिल्हा परिषदेचा त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ते सहभाग घेत असतात. गणेश तांबे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, बिबी-आदर्की केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन शिंदे, गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम,शाळेचे मुख्याध्यापक मोहन बोबडे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya