मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांच्या टीम मुळे रुग्णाला मिळाले त्वरित उपचार : अनुप शहा


स्थैर्य, फलटण : येथील मारवाड पेठ मधील एक वृद्ध महिला गेले दोन दिवस तापाने फणफणत होती व तिच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. नगरसेवक अनुप शहा यांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी लगेच फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पाणी पुरवठा अधिकारी विनोद जाधव व नगरपरिषदेच्या टीमने सदरील महिलेला उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्वरित उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले व तिच्यावर त्वरित उपचार करण्यात यावेत या बाबत उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनास नगरपालिकेमार्फत कळवण्यात आले.

Previous Post Next Post