काळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण

 

स्थैर्य, लोणंद, दि.२९: काळज, ता. फलटण यतेहून सुमारे आठ ते दहा महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात अपहरण कर्त्याने दुचाकीवरून जोडीने बाळ पळवून नेहले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशी माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सह्यायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दैनिक स्थैर्यच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, काळज ता. फलटण येथून २२ ते २५ वर्ष्याच्या काळा शर्ट व जीन्स घातलेल्या पुरुषाने व त्याच्या सोबत गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातलेल्या महिलेने आठ ते दहा महिन्यांचे बाळ पळवून नेहलेले आहे. तरी सर्वानी सतर्क राहून असे कोणी आढळून आल्यास लोणंद पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी केलेले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya