प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण

 

स्थैर्य, फलटण, दि.२८: येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना ठरलेल्या पैशापेक्षा जास्त पैशाची मागणी केल्यानंतर त्यास सागर शहा यांनी नकार दिल्यामुळे वर्धमान दोशी व इतर तीन जणांनी मारहाण केलेली आहे. याबाबत सागर शहा यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केलेला आहे, अशी माहिती सागर शहा यांनी दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की, सागर शहा व वर्धमान दोशी यांच्यामध्ये ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर ऑफिस येथे व्यवहाराची नोंद करण्यासाठी सर्व जण आलेले होते. परंतु वर्धमान दोशी यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त पैशाची मागणी केली व त्यास सागर शहा यांनी नकार दिला, म्हणून त्यांना वर्धमान दोशी व इतर तीन जणांनी मारहाण केलेली आहे. याबाबत सागर शहा यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केलेला आहे, अशी माहिती सागर शहा यांनी दिलेली आहे.
Previous Post Next Post