शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

स्थैर्य, सातारा दि. २०: कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या वेबपोर्टलवर इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. इच्छूक शेतकऱ्यांचे अर्ज या पोर्टलवर स्वीकारण्यात येतील असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुचना या सदराखाली देण्यात आली आहे, असे सातारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.