किसान किर्डेट कार्ड देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बैंकावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा.- विक्रमबाबा पाटणकरस्थैर्य, पाटण, दि. २९ : देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू केलेल्या किसान किर्डेट कार्ड व पशूधन किसान किर्डेट कार्ड या योजना सुरू केलेल्या असताना काही राष्ट्रीय बैंका व जिल्हा बैंका शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ व समज घेऊन शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार विना तारण विना जामीन कोणत्याही पध्दतीचा विना दाखला सरसकट १ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून किसान किर्डेट कार्ड १४ दिवसांच्या आत सन्मानाने शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. असे आसताना शेतकऱ्यांना द्यावयाचे कर्ज जणू  बैंकेच्या स्वनिधीतून द्यावयाचे आसल्या सारखी भाषा बैंका करत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना शासनाने समज देऊन शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन किसान किर्डेट कार्ड, पशू किसान किर्डेट कार्ड त्वरित आदा करावीत अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी बैंका व प्रशासनाला प्रत्येक्ष व निवेदनाद्वारे दिला आहे.


केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या किसान किर्डेट या योजनेच्या मागणीसाठी शेतकरी राष्ट्रीय बैंक व जिल्हा मध्यवर्ती बैंकेत गेले असता किसान किर्डेट कार्ड हि योजना शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करतात. व योजनाच लागू होत नाही असे शेतकऱ्यांना सांगून टाकतात. या संदर्भात पाटण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसील कार्यालय पाटण, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-पाटण,     बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-पाटण व सातारा जिल्हा मध्यवर्ती बैंक शाखा - पाटण येथे भेटी दिल्या. व सदर  शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने लागू केलेली योजना  शेतकऱ्यांसाठी राबविण्यात यावी व १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी केली. अन्यथा संबंधित बैंका व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले असा इशारा यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांनी दिला.


केंद्र शासन निर्णय अद्यादेश आदेश क्र- 1-20/2018 या शासन निर्णयाने जी व्यक्ती पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत त्या प्रत्येकाला १.६० पर्यंत विना तारण कर्ज व १.६० लाखाच्या वरील कर्ज अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आसताना स्थानिक व पक्षीय राजकारण मधे बैंका गुरफटत असून आनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणारे आहे. व हि बाब शेतकरी व राष्ट्रहिताच्या विरोधी असून जर का शेतकऱ्यांची आडवणूक केल्यास व शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ न दिल्यास शेतकऱ्यांचे पैसे बैंकां वापरत आसल्यामूळे बैंकावर शेतकऱ्यांचे पैसे वापरले म्हणून  दरोड्यांचे गुन्हे दाखल करावेत.. अशी मागणी शेवटी त्यांनी यावेळी केली.  यावेळी फत्तेसिंह पाटणकर, अंकुशराव साळुंखे, शफीभाई सातारकर, पंडीतराव मोरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Previous Post Next Post