अखेर धोकादायक वळण काटेरी झुडपांतुन मुक्त

 

                                     

स्थैर्य, वावरहिरे, दि.२२: वावरहिरे येथील दानवलेवाडी कडे जाणार्‍या मुख्ख रस्त्यावर ग्रामपंचायत नजीक असलेल्या धोकादायक वळणावर असलेल्या काटेरी झुडपांनी साईटपट्ट्यावर अतिक्रमण करुन रस्ता अरुंद केला होता.हा रस्ता रहदारिचा असल्याने गवत व काटेरी झुडपांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहन चालकांना याठिकाणी मोठी कसरत करावी लागत होती.अचानक समोरुन येणारे वाहन या ठिकाणी दिसत नव्हते.याठिकाणी अचानक वाहन समोर येवुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या संबधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन यांना वारंवार सांगुन देखील या संबधीत कोणतेही उपाययोजना होत नव्हती.समोरा समोर दोन वाहने आल्यास काटेरी झुडपे व गवत असल्याने साईट देता येत नव्हती प्रसंगी वाहन चालकामध्ये वादावादिचे प्रसंग घडत होते. वाहन चालक व ग्रामस्थ यांची होणारी अडचण व भविष्यात घडणारी दुर्घटना टाळण्यासाठी या संबधितचे वृत्त दैनिक स्थैर्य ने प्रसिद्ध केले होते.त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्री संदिप अवघडे यांनी केलेले प्रयत्न पाठपुराव्यांनी व ग्रामसेवक श्री शिंदे साहेब यांच्या विशेष सहकार्याने सदर धोकादायक वळणावरील असणारी काटेरी झुडपे व वाढलेले गवत काढुन सदर रस्ता मोकळा करण्यात आला.वाहन चालक व ग्रामस्थांनी सदर रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामसेवक श्री शिंदेसाहेब, ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे व दै स्थैर्य चे विशेष आभार मानले.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya