अखेर सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर

 

ना. अजित पवार यांच्या हस्ते सातारा शहराच्या हद्दवाढ मंजूरीचे पत्र स्विकारताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश; महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा


स्थैर्य, सातारा, दि. ०८ : सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळेल. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठीच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अभ्यासपुर्ण पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून चालू अधिवेशनात सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करुन घेतला. यामुळे सातारा पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आणि सातारकरांसाठी अत्यावश्यक असणारा प्रश्‍न मार्गी लागल्याने सातारकर आणि उपनगरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.


दरम्यान, हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी सहकार्य करणार्‍या उपमु‘यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील या तिघांचेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांच्याावतीने आभार मानले आहेत.


सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसं‘या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मुलभूत सोयी, सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत होते. सातारा शहरालगत अनेक पर्यटनस्थळे आहेत. विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सं‘या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सातारा शहराची हद्दवाढ होणे अत्यावश्यक होते.


गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत होता. यामुळे सातारा शहराच्या आणि आसपासच्या उपनगरांच्या, त्रिशंकू भागाच्या विकासावर दुरोगामी परिणाम होत आहे. त्यामुळे एक जनहिताची बाब म्हणून सातारा शहराच्या हद्दवाढीस तातडीने मंजूरी देवून मुलभूत सोयी- सुविधांपासून वंचीत राहणार्‍या उपनगरे व त्रिशंकू भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा हद्दवाढ मंजूरीसाठी सातत्याने अभ्यासपुर्ण पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात त्यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्‍नही उपस्थित केला होता. सरकार कोणत्याही पक्षाचे असो सातारा- जावली मतदारसंघातील विकासकामांमध्ये खंड पडता कामा नये, यासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामांसाठी सातत्याने निधी खेचून आणला आहे. हद्दवाढीच्या ठरावाबाबतीतही याचाच प्रत्यय आला असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चालू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उपमु‘यमंत्री अजित पवार यांचे मैत्रीपुर्ण संबंध नेहमीच सातारकरांच्या पथ्यावर पडले आहेत. त्याचाच परिणाम हद्दवाढीच्या प्रश्‍नातही दिसून आला.


मंगळवारी सकाळी उपमु‘यमंत्री ना. अजित पवार यांनी स्वत: आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दालनात बोलावून घेवून सातारा शहराच्या हद्दवाढ मंजूरीचे पत्र त्यांच्या स्वाधिन केले. हद्दवाढ मंजूरीसाठी ना, पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, सातार्‍याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले आणि याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तिघांचेही सातारकरांच्यावतीने आभार मानले. आता शहराचा विकास अधिक गतीने होणार असून सातारा पालिकेची महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शहरालगतच्या उपनगरांचा आणि त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


दिलेला शब्द पाळला...

सातारा नगर पालिकेच्या निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास आघाडीच्यावतीने सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करुन घेणार असा शब्द सातारकरांना दिला होता. तो शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खरा करुन दाखवला. सातारा पालिकेत आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आघाडीची सत्ता नसतानाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शहराच्या विकासकामांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. साताराकरांचे सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेत सत्ता नसतानाही शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न निकाली काढला आणि सातारकरांना दिलेला शब्द पाळला.


पुढचे लक्ष एमआयडीसी...

सत्ता असो किंवा नसो एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कायम विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला आहे. सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेला कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंजूर करुन घेतला. त्यावेळीही उपमु‘यमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव मंजूर करताना ४२ कोटी निधी दिला. कालांतराने या प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडले. मात्र सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा पाठपुरावा केला आणि ना. अजितदादा यांच्याकडूनच कास धरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी वाढीव ५८ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. आता कित्येक वर्षांपासून प्रलंबीत असलेला हद्दवाढीचा प्रश्‍नही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निकाली काढला. हे दोन महत्वाचे प्रश्‍न सोडवल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे पुढचे लक्ष सातारा एमआयडीसी आहे. आगामी काळात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे, कंपन्या सातार्‍यात येण्यासाठी प्रयत्न करणार तसेच देगांव, निगडी एमआयडीसी सुरु करुन रोजगानिर्मीतीला चालना देणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.