रस्त्यात वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थडे बॉयसह पाच मित्रांवर गुन्हा दाखल

 


स्थैर्य, सातारा, दि. 4 : कोवीड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून रस्त्यात जमाव जमवून वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थ-डे बॉयसह पाच जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बर्थडे बॉय अक्षय मनोहर लोहारसह त्याच्या पाच मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. 


याबाबत माहिती अशी की, दि. 3 रोजी शाहुपूरी पोलीस पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस पेट्रोलिंग करत होते. यावेळी रात्री 7.45च्या सुमारास मोळाच्या ओढा परिसरातील अमर गॅरेजसमोर काही मुले जमाव जमवून वाढदिवस साजरा करत होते. या मुलांनी अ‍ॅक्टिव्हा (एमएच-11 सीई 5955) व मोटारसायकल (एमएच 11 सीसी 275) यांवर केक ठेवला होता. पोलिस गाडी आलेली पाहताच मुले पसार झाली. दरम्यान, सपोनि वायकर सो., पो. ना. कुंभार हवालदार घाडगे हेही त्याठिकाणी आले. तेथे मोटार सायकल रोडवर पडुन तिचे हेडलाईटची काच फुटलेली होती. पोलिसांनी दोन्ही दुचाकी ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणून लावल्या. तसेच याबाबत माहिती घेतली अक्षय मनोहर लोहार वय -25 वर्षे , रा.आकाशवाणी झोपडपट्टी हा बर्थड बॉय त्याचे मित्र किशोर सुर्यकात सुर्यवंशी वय 31 वर्षे रा. आकाशवाणी झोपडपट्टी शाहुपूरी, आकाश संतोष पाटोळे वय 18 वर्षे रा. 446 मंगळवार पेठ, सातारा तसेच इतर पाच मुलांसमवेत गर्दी जमवून वाढदिवस साजरा करत असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवुन वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पाचही जणांवर गुन्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya