नागठाणे येथील चाळीस वर्षीय महिलेची आत्महत्या

 


स्थैर्य, सातारा दि. ०४ : नागठाणे येथील चाळीस वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सदर महिलेचा मृतदेह माजगाव येथील केटी बंधाऱ्याचे जवळ आढळून आला आहे. सुशिला विलास पाटोळे (वर्ष चाळीस सध्या राहणार नागठाणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुशिला विलास पाटोळे या गेल्या चार ते पाच वर्षांपासून नागठाणे येथे आई-वडिलांसोबत वास्तव्यास होत्या. सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यादिवशी सर्वत्र शोध घेतल्यानंतर मंगळवारी बोरगाव पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुशीला पाटोळे यांचा नागठाणे परिसरात शोध घेणे सुरू होते. काल नागठाणे गावच्या लगत उरमोडी नदी मध्ये एक मृतदेह वाहत जात असल्याचे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मुलांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती कुटुंबीयांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली.


यानंतर या नदी परिसरात शोध घेतला असता एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुशिला विलास पाटोळे यांचाच असल्याची रात्री झाली आहे.


या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पीएसआय वर्षा डाळिंबकर व सहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.
Previous Post Next Post