आज जाहीर होईल आयपीएलचे वेळापत्रक, रैनाच्या संघात पुनरागमनासाठी कर्णधार-प्रशिक्षकाशी चर्चा केली : गांगुली

 

स्थैर्य, सातारा, दि.५: आयपीएल सुरू होण्यास दोन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र, आतापर्यंत स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. कोरोनामुळे त्याला उशीर होत आहे. यादरम्यान मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले की, ४ सप्टेंबर, शुक्रवारी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल. यंदा लीगचे सामने यूएईत होतील. जातील. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा चालेल. दुबई, शारजाह व अबुधाबीमध्ये एकूण ६० सामने खेळवले जातील.

यादरम्यान यूएईत उपस्थित बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीमधील एक वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आढळला. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, आमचा एक वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित झाला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने धोका नाही. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहेे. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जातेय. ते कुणाच्याही संपर्कात नव्हते आणि यूएईला येताना संसर्ग झाल्याची शंका आहे. २९ ऑगस्ट रोजी बीसीसीआयने २ खेळाडूंसह १३ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यात चेन्नई सुपरकिंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर व फलंदाज ऋतुराज गायकवाड यांचा समावेश असून इतर सपोर्ट स्टाफ आहे. बीसीसीआयने आयपीएलदरम्यान २०,००० चाचण्या करण्याचे नियोजन आहे. यावर १० कोटी रुपये खर्च होईल. त्याचबरोबर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत २ जण पॉझिटिव्ह आले.

चेन्नईचा आजपासून सराव
दुबई | चेन्नई सुपरकिंग्जचे खेळाडू शुक्रवारपासून सराव सुरु करतील. गुरुवारी दुसऱ्या चाचणीच्या निकालानंतर हा निर्णय घेतला. दीपक चाहर व ऋतुराज गायकवाड वगळता इतर सर्वजण सराव करतील. बीसीसीआयच्या एसओपीनुसार खेळाडूंची सहा दिवसांत ३ कोरोना चाचणी करायच्या आहेत, असे सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी म्हटले.

एलिट पॅनलचे ३ अंपायर
बीसीसीआय आयपीएलसाठी जास्तीत जास्त आयसीसी एलिट पॅनलच्या अंपायर्सना सोबत घेऊ इच्छिते. मात्र, आतापर्यंत विदेशातील केवळ ३ एलिट पॅनलच्या अंपायर्सनी होकार दिला. सामना रेफरीसाठी केवळ जवागल श्रीनाथ तयार झाला. सध्या न्यूझीलंडचे क्रिस गाफने व रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लंडच्या मायकेल गॉफ, भारताच्या नितीन मोहनने होकार दिला.

रैनाचे पुनरागमन धोनीवर निर्भर: सुरेश रैनाने वादामुळे चेन्नईचे शिबिर सोडले होते. तो देशात परतला. मात्र, पुन्हा एकदा तो संघात दाखल होईल, अशी चर्चा आहे. तो व्यवस्थापन, कर्णधार धोनी व प्रशिक्षक फ्लेमिंगशी चर्चा करतोय. रैनाने कोणताही वाद नाही, कौटुंबिक कारणामुळे परतल्याचे म्हटले. संघ मालक श्रीनिवासन म्हणाले, संघात कोण राहिल हा निर्णय कर्णधार घेतो, मी नाही.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.