खटाव तालुक्यात प्रत्येक गावात रा.स.प. चे विचार पोहचविणार : श्रीकांत देवकर

रा.स.प.च्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचा झेंडा फडकवून आनंद व्यक्त करताना युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर समवेत मान्यवर कार्यकर्ते.( छाया :समीर तांबोळी )


स्थैर्य, कातरखटाव, दि. ३१ : आगामी काळात खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार पोहचविण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे युवका जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी केले.


निमसोड (ता. खटाव) येथील पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नारायणराव यादव, प्रकाश घाडगे, नाना घाडगे, हणमंत घाडगे, विलास देवकर, मोहन देवकर, राम देवकर, संतोष देवकर, विकास देवकर, चैतन्य जाधव आदी उपस्थित होते.


देवकर म्हणाले, तळागाळातील उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आनण्यासाठी महादेवराव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्ष विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही. तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करण्याचे माध्यम आहे. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याबरोबर अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढा उभा करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची संघटना बांधून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाची ताकद आजमावली जाणार आहे. यावेळी कार्यकत्यांनी अनेक घरे, तसेच मोठ्या वृक्षावर झेंडे फडकावले. तसेच कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना मास्क तसेच आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.