खटाव माणमधील दोन आरटीओंना बढती

 

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांचा सत्कार करताना भास्करशेठ खाडे (छाया : समीर तांबोळी )

स्थैर्य, कातरखटाव, दि. ३१ : परीवहन नियंत्रण (आर.टी.ओ.) विभागात कार्यरत असणार्‍या खटाव-माण तालुक्यातील दोन सुपुत्रांना नुकतीच बढती मिळाली आहे. यामधे खटाव तालुक्यातील पुसेगांवचे सुपुत्र सचिन विधाते यांची प्रादेशिक कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. यापूर्वी ते पिंपरी चिंचवड कार्यालयात वाहन निरीक्षकपदी कार्यरत होते. तर बिदाल (ता. माण) येथील सुपुत्र गजानन ठोंबरे यांची पनवेल येथे असिस्टंट आर. टी. ओ. पदी बढती झाली आहे.


पदोन्नतीबद्दल श्री. विधाते व ठोंबरे यांचा खटाव तालुका मित्र मंडळाच्या वतीने तडवळेचे माजी सरपंच भास्करशेठ खाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमृत गोडसे, सोनाली चोधर, रविंद्र कुदळे, अक्षय माळवे, शुभम खाडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विधाते म्हणाले, पिंपरी चिंचवड विभागात काम करताना सर्वांना बरोबर घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. बढतीनंतर तालुकावासियांनी केलेला सत्कार लाख मोलाचा आहे. या सत्कारातून भविष्यात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. भास्कर खाडे यांनी विधाते व ठोंबरे यांच्या कार्यकालातील चांगल्या कामांच्या आठवणी सांगितल्या.


 


Previous Post Next Post