अवघ्या 24 तासात तिघे दुचाकीचोर गजाआड

 

स्थैर्य,सातारा, दि. २३: सुलतानपूर, वाई येथे मोटारसायकल चोरणार्‍या तीन चोरट्यांना वाई पोलिसांनी 24 तासात गजाआड केले. यामध्ये एक विधीसंघर्ष बालक आहे. 

याबाबत माहिती अशी, दि. 21 रोजी रात्री सुलतानपूर येथुन दुचाकी (एमएच 11 सीव्ही 1651) चोरीला गेली. याबाबत धनराज नारायण पिल्ले यांनी वाई पोलीस ठाण्यास फिर्याद दिली होती. त्यानंतर पो.नि. आनंदराव खोबरे यांच्या निरिक्षणाखाली टीम तयार केली. गुन्हे प्रकटीकरणाचे पथकातील एसआयआय कृष्णराज पवार, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, अमित गोळे, सिध्देश्‍वर वाघमोडे यांनी तात्काळ तपासास सुरूवात केली व सीसीटीव्ही कॅमेराच्या साह्याने अवघ्या 24 तासात चोरट्यांना गजाआड केले. करण सत्यवान काळे, वय:18 वर्ष रा. भिरडाचीवाडी भुईंज,ता. वाई, लहू यशवंत गायकवाड वय 21 रा. बावधन, ता.वाई व एक विधी संघर्ष बालक यांचा यात समावेश आहे. तपास पोलीस हवालदार सुजाता मोकाशी करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya