म्हसवड येथे १० नव्या कोरोना रुग्णांची वाढ : म्हसवड शहराची कोरोना संख्या पोहचली २५० च्या घरात

 


स्थैर्य, म्हसवड, दि. ५ : म्हसवड शहरातील कोरोनाची संख्या काही केल्या कमी येत नसल्याने म्हसवडकरांनी आता शहरात कडक लॉकडाउन सुरु केले असुन यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनाला वाटत असतानाच दि.५ रोजीच्या कोरोना अहवालानुसार म्हसवड शहरात पुन्हा नव्या १० रुग्णांची भर पडली आहे.


शहरात कोरोनाने अक्षरशा हाहाकार उडवुन दिलेला असुन शहरात रोज नव्याने होणार्या बाधितांचा आकडा हा वाढु लागला आहे, रोज नवनवीन लोकं बाधित होवु लागल्याने सर्व म्हसवडकर जनता चिंतेत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात १४ दिवसांचा लॉकडाउन सुरु केला असुन म्हसवड शहरात दररोज वाढणार्या बाधितांवर आरोग्य, पालिका व पोलीस लक्ष ठेवुन आहेत, तर शहरातील साखळी तोडण्यासाठी माणचे आ.जयकुमार गोरे यांनी गत ५ दिवसांत दोनवेळा भेटी देत प्रशासनासोबत बैठका घेत यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी निकराचे प्रयत्न करीत आहेत. 

दरम्यान दि. ५ रोजी म्हसवड शहरात नव्याने बाधित झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये भगवानगल्ली येथील ३२ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील ७१ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय युवती, गुरव गल्ली येथील ५६ वर्षीय पुरुष, माळी गल्ली येथील ४६ वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील ५९ वर्षीय महिला यासह उर्वरीत ५ जण हे म्हसवड शहरातील रहिवाशी असुन आदीजणांचा समावेश आहे. शहरात दररोज वाढणार्या कोरोना रुग्णांमुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हा २४० वर पोहचला अाहे. पुढील काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार असुन ये - त्या दोन दिवसांत ही संख्या २५० च्या पुढे जाईल असे बोलले जात आहे. 


म्हसवडमध्ये होणार रँपीड कोरोना टेस्ट 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंन्टेटमेंट झोनमधील सर्व बाधितांच्या संपर्कातील व जेष्ठ नागरीक, दुर्धर आजारग्रस्तांची,बी.पी., शुगर आदी व्याधी असलेल्या सर्वांची आरोग्य. विभागामार्फत रँपीड टेस्ट केल्या जाणार आहेत.


म्हसवड शहरात दररोज होणार जंबो रँपीड टेस्ट 

शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वांची रँपीड टेस्ट करण्याचे प्रशासनाने जाहीर केले असुन त्यासाठी शहरातील दररोज किमान ५०० जणांच्या रँपीड टेस्ट करण्याचे ठरवले असल्याचे समोर येत आहे यामध्ये जे बाधित येतील त्यांना येथील खाजगी विद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तर त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.


विविध ठिकाणी होणार रँपीड टेस्ट 

म्हसवडकर जनतेला कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका व आरोग्य विभागाने कंबर कसली असुन म्हसवडकरांची जंबो रँपीड टेस्ट केली जाणार आहे, त्यासाठी म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, जि.प. शाळा क्र.२ ( रथगृह ) व कोरोना केअर सेंटर आदी ठिकाणी या टेस्ट केल्या जाणार आहेत.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya