पाचगणीत एकाच दिवसात 12 कोरोना बाधित

 


स्थैर्य, पाचगणी, दि. 4 : पाचगणी शहराचा कोरोना आलेख दिवसेंदिवस वाढत असून पाचगणीकरांची धाकधूक वाढली आहे. आज तब्बल 12 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


पाचगणी शहरात बर्‍याच उपाययोजना करूनही सिध्दार्थ नगर येथे कोरोना बाधित महिला सापडल्यानंतर कोरोनचा शिरकाव झाला. बरेच दिवस शांतता होती. परंतु हळू हळू प्रत्येक विभागात कोरोनाचे रुग्ण सापडले जावू लागले. त्यामुळे सर्वजण कोरोनच्या दहशतीखाली होते. शाहूनगर येथील 1, बाजारपेठ 5, एका नामांकित शाळेत आणखी 3 तर उद्यानाजवळच्या एका हॉटेलमधील विभागात 3 रुग्ण सापडले आहेत. परंतु हॉटेलमधील सापडलेले रुग्ण हे खिंगर येथील असून ते कामानिमित्त येथे येत असतात. पालिका प्रशासनाने लागेच हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. मध्यंतरी काही बँका, शाळांमध्ये शिरकाव झाला तर आता हॉटेलमध्ये झालेला शिरकाव चिंताजनक आहे. पाचगणी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरू नये. नगरपालिका त्या भागात औषध फवारणी करत आहे. नागरिकांनी फक्त कंटेन्मेंट क्षेत्रात वावर टाळावा. पालिकेचे कर्मचारी सतर्क असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.