पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य प्रेरणादायी : जयकुमार शिंदे

 

स्थैर्य, फलटण, दि.२६: अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करुन समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन कार्य हे नक्कीच प्रेरणादायी असून तरुण पिढीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सूचनेनुसार कोळकी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. 

या वेळी कामगार नेते बाळासाहेब काशीद, कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप नेवसे, रणजित जाधव, सुधीर जगदाळे, प्रदीप भरते, राजेंद्र जगदाळे, विशाल घोरपडे, नितीन काटकर, अभिजीत शिंदे, पै. रणजीत काशिद, पार्थ पोरे, समर्थ नेवसे, गणेश वाकोडे यांची उपस्थिती होती.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे महामंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जनसंघासाठी खूप मोठे असे काम केलेले आहे. त्यानंतर त्या काळात ते जनसंघाचे अध्यक्ष झाले व त्यांच्या पुण्याई मुळेच आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये आपले सरकार प्रस्थापित करू शकलेले आहे. सामाजिक कार्य करत असताना जाणकार पत्रकार, लेखक व शिक्षणतज्ञ अशीही त्यांची ओळख होती, असेही जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post