रिया-सुशांत ड्रग्ज प्रकरणात ‘केजे’ला अटक

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: रिया आणि सुशांतला ड्रग्ज पुरवठा करणाºयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात एनसीबीच्या गळाला आणखी एक मोठा मासा लागला आहे. ड्रग्ज पुरवढा करणारा ‘केजे’ याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. करनजीत असे त्याचे नाव असून त्याला ‘केजे’ या टोपण नावाने ओळखले जात होते. मुंबईतून त्याला अटक करण्यात आला आहे. 

‘केजे’ हा कॅपरी आणि लिटिल हाइट् येथे ड्रग्ज पुरवठा करत होता अशी माहिती पुढे आली आहे. सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविकला तो ड्रग्जचा पुरवढा करत होता. त्यानंतर हा सगळा माल रिया आणि सुशांतला दिला जात होता अशी माहितीही पुढे आली आहे. करमजीतला एनसीबीच्या ऑफिसमध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे. शोविकसोबत त्याचे थेट संबंध असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

Previous Post Next Post