कंगना राजभवनात:बीएमसीने कार्यालय पाडल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनोट राजभवनात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट


स्थैर्य, मुंबई, दि.१३: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. बीएमसीने कंगनाचे वांद्र्यातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ही भेट होती असे बोलले जात आहे. दरम्यान या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अभिनेत्री कंगना रनोट साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली. दुपारी चार वाजता ती राजभवनात पोहोचली. तिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आहे. यावेळी तिची बहीण रंगोली तिच्यासोबत उपस्थित होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. यानंतर कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही झालं होतं. दरम्यान महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. यानंतर कंगना जास्तच भडकली होती.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.