भाजपचे पोपट:कंगना तर भाजपचे पोपट आहे, तिला Y कशाला केंद्राने Z+ सुरक्षा द्यायला हवी; विधानसभा परिसरात आमदारांचा कंगनाविरुद्ध आक्रोष

 

स्थैर्य, मुंबई, दि.७: कंगना रनोटने मुंबईची पाकप्यात काश्मीरशी तुलना करून महाराष्ट्रातील राजकारण्यांचे संताप ओढावून घेतले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात सुद्धा आमदारांमध्ये कंगनाविरुद्धचा रोष प्रकर्षाने दिसून आला. यात काँग्रेस आणि शिवसेनेसोबत समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा कंगनाच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना Y सुरक्षा हे धक्कादायक -गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कंगनाला केंद्राकडून मिळालेल्या Y सुरक्षेचा निषेध केला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना Y सुरक्षा दिली जाते हे धक्कादायक आहे. महाराष्ट्र केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे नाही तर तमाम जनतेचे आहे. असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची सुद्धा चौकशी व्हायला हवी -शिवसेना

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्याला ड्रग्स अर्थात अमली पदार्थ आणि बॉलिवूड कनेक्शन लागले आहे. यामध्ये अनेक सिलेब्रिटींची नावे समोर येत आहेत. कंगनाने काहींची नावे जाहीर करणार असल्याचे म्हटले. त्यावर काही कलाकार कंगनाचे सुद्धा नाव घेत आहेत. त्यामुळे, ड्रग्स आणि बॉलिवूड कनेक्शनचा तपास करत असताना कंगनाचा ड्रग्स कनेक्शन काय आहे याचा देखील तपास व्हायला हवा अशी मागणी विधानसभा परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

महाराष्ट्रातून हकलून लावायला हवे -अबु आझमी

बॉलिवूडमध्ये वंशवादवर बोलता बोलता कंगना इस्लामिक बॉलिवूडमध्ये डिइस्लामिक कल्चर आणत असल्याचे दावे करत आहे. म्हणजे, मुस्लिम किंवा अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती बॉलिवूडमध्ये काम करत असेल तर त्या विरोधात मी आवाज उठवते आणि यामुळेच माझे जीव धोक्यात टाकले गेले असेही ती सांगत आहे. असले लोक महाराष्ट्राचा अपमान करतात त्यांना कुणीही सपोर्ट करू नये. अशांना महाराष्ट्रातून हकलून लावायला हवे असे समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी म्हणाले आहेत.

कंगना भाजपचा पोपट -विजय वडेट्टीवार

कंगनाला वाय सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळणाऱ्या धमक्या पाहता केंद्र सरकारने तिला वाय प्लस सुरक्षा दिली. याबद्दल तिने गृहमंत्री अमित शहांचे आभार सुद्धा मानले. पण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते, कंगना तर भाजपची पोपट आहे. तिला वाय सुरक्षा नको तर चक्क झेड प्लस सुरक्षाच द्या. कंगनासारखे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात असेही ते पुढे म्हणाले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.