कंगनाला मुंबई विमानतळावर उतरताच करणार होम क्वारंटाईन; म्हणाली होती कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा


स्थैर्य, मुंबई, दि.७: मुंबईला पाकिस्तान व्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनोटला शिवसेना आणि मुंबई महापालिकेने आणखी एक धक्का दिला आहे. कंगनाने मुंबई विमानतळावर उतरताच तिला होम क्वारंटाइन केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांनी कोरोना काळात मुंबईत येणाऱ्यांसाठी असलेल्या नियमाची कंगनाला आठवण करून दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिला 7 दिवस होम क्वारंटाईन केले जाऊ शकते.

7 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार...

एकीकडे, सीएनएन न्यूज18 च्या वृत्तानुसार कंगनाला मुंबईत पाय ठेवताच होम क्वारंटाईन केले जाणार असे मुंबईच्या महापौर म्हणाल्या आहेत. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार, होम क्वारंटाईन केले जाते. तर दुसरीकडे, टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, कंगनाला विमानतळावर उतरल्यानंतर नियमानुसार, सेल्फ होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

सोमवारीच बीएमसीची धाड...

उल्लेखनीय बाब म्हणजे, कंगनाने सोमवारीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये तिच्या मुंबईतील कार्यालयावर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे, तर तिच्या कार्यालयावर धाड टाकून हे अधिकारी कथितरित्या शेजाऱ्यांना देखील त्रास देत असल्याचा दावा तिने केला आहे.

कुणाच्या बापात हिंमत असेल तर...

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना खासदार संजय राउत यांच्यात वाद सुरू झाला. त्याच दरम्यान, आपण मुंबईत येणार असल्याची आव्हान कंगनाने दिले. यावेळी एक ट्विट करताना "मी 9 सप्टेंबर रोजी मुंबईत लँड करणार आहे. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा" असे कंगनाने म्हटले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्र सरकार आणि कंगनामध्ये वाद उफाळून आला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.