नागझरीचे सुपुत्र नायब सुभेदार लक्ष्मण भोसले यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

 

स्थैर्य, नागझरी, दि.२२: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले यांचे सोमवारी दि.२१ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.

नायब सुभेदार क्ष्‍मण भोसले यांचे पार्थिव नागझरी येथे आल्यानंतर शहीद क्ष्‍मण भोसले अमर भारत माता की जय अशा जयघोषाने संपूर्ण नागझरी पर्वत परिसर दणाणून गेला यावेळी नायब सुभेदार क्ष्‍मण भोसले यांचे पार्थिव एसटी स्टँड ते चांदणी चौक मार्गे ग्रामपंचायत कार्यालय असे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या ट्रॅक्टर मधून व फुलांचा वर्षाव करीत शहीद नायब ुभेदार लक्ष्‍मण भोसले या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना गावकर यांचे डोळे पाणावले होते

नायब सुभेदार लक्ष्‍मण भोसले यांनी देश सेवेसाठी पंधरा वर्षे अविरतपणे सेवा केली, त्यानी सिकंदराबाद जम्मू-काश्मीर यासह सिक्कीम , नथुलापास चीन सीमेवर व पुणे खडकवासला, नाशिक,देहरादून,चेन्नई याठिकाणी आणि सैनिक प्रशिक्षण केंद्रावर अत्यंत चांगली सेवा बजावली सुभेदार लक्ष्‍मण भोसले हे मनमिळावू व नेहमी दुसऱ्याला मदत करण्याची की त्यांची ची इच्छा होती. यानुसार नागझरी व परिसरातील शेकडो तरुणांना त्यांनी सैन्यदलात भरती होण्यास संदर्भात मार्गदर्शन केले लक्ष्‍मण भोसले यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ ,पत्नी, दोन मुले ,भावजयी असा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने नागझरी गावावर शोककळा पसरली होती.
नायब सुभेदार लक्ष्मण भोसले यांच्यावर रात्री नागझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya