राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धा

 


स्थैर्य, पणजी,  24 : गोवा टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. 09 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान टपाल सप्ताह साजरा केला जाणार आहे. पत्रलेखन स्पर्धा केवळ गोवा विभागापुरती मर्यादीत आहे. ‘पोस्टमन- आपला कोविड योद्धा’ हा पत्रलेखन स्पर्धेसाठी विषय आहे. ही स्पर्धा 18 वर्षांखालील वयोगटासाठी आहे.


स्पर्धक गोवा राज्यातील असावा. स्पर्धकांनी जन्मतारखेच्या पुराव्यासह आपली प्रवेशिक पाठवावी. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. पत्रलेखनासाठी 500 शब्दांची मर्यादा आहे. प्रवेशिका A4 आकाराच्या पेपरवर पाठवाव्या. स्पर्धेसाठी इंग्रजी, हिंदी, कोंकणी, मराठी भाषेतून पत्रलेखन करता येईल. पत्र पाठवण्यासाठी अंतिम दिनांक 09 ऑक्टोबर 2020 आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 3000/,  2000/- 1000/- रुपयांचे पारितोषक दिले जाईल. पत्रलेखन वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी 403001 या पत्त्यावर पाठवावे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya