एचव्हीडीएस योजना अंतर्गत चालू असलेल्या आयुष्य इलेक्ट्रिकल व विक्रान कंपनी ठेकेदाराच्या मुस्क्या आवळा अन्यथा कार्यलय फोडू- राजू मुळीक

 


स्थैर्य, वावरहिरे, दि. २६  (अनिल अवघडे) : दहिवडी (ता.माण)तालुक्यात महावितरण विभागाचे खाजगी ठेकेदार हे जमिनीचे मालक झाले आहेत का? कोणाला ही न विचारता हजारो शेतकऱ्यांच्या शेतातून महावितरण विभागाचे खाजगी ठेकेदारांनी पोल उभे केले आहेत व तारा ओढल्या आहेत. हे तातडीने थांबवा अन्यथा महावितरण विभागाचे कार्यलय फोडू असा इशारा ग्राहक प्रबोधन समितीचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत दिला आहे.


एचव्हीडीएस योजना अंतर्गत माण-खटाव तालुक्यातील चालू असलेल्या आयुष्य इलेक्ट्रिकल व विक्रान कंपनीच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू असून हजरो शेतकरी वर्गाच्या शेतातुन न विचाराता पोल तसेच जनित्र उभे केली आहेत. तसेच अजून ही उभे करत आहेत. यांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात तसेच २०१३ साली मंजूरी असणाऱ्या जाधववाडी प्रकल्पाला २०१५ मध्ये पूर्ण करण्याचे आदेश महावितरण विभागाने दिले होते मग ते पूर्ण का करता आले नाही..? तसेच ते काम अर्धवट ठेवून त्या कामाचे जोड शिंगणापूर रस्त्यालागत जुन्या लाईन वरती का देण्यात आला आहे. तो देखील अनधिकृत पणे का दिला आहे. एवढं सावळा गोंधळ होत असताना देखील महावितरण विभागाचे दहिवडी उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, तसेच वडुज विभागाचे अभियंता हे डोळे बंद करून का बसले आहेत. याची देखील चौकशी करण्यात यावी अन्यथा महावितरण विभागाला याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील असा इशारा देखील मुळीक यांनी दिला आहे.तालुक्यातील राजकीय ताकद वापरुन हा उपद्व्याप केला जात आहे. हजारो शेतकऱ्यांच्या शेतातून पाहिजे असे सोईस्कर पोल उभे करुन तारा ओढल्या आहेत. यांची कल्पना कोणत्याच शेतकऱ्याला कशी दिली गेली नाही? ठेकेदाराने कोणत्याही विभागाची परवानगी न घेता पोल लावले कसे... ? अनेक ग्रामपंचायत तसेच दहिवडी नगरपंचायत यांची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र त्या देखील घेतल्या गेल्या नाहीत.ठेकेदाराने राजकीय ताकद वापरुन अनेक अधिकारी तसेच नेते मंडळी हाता खाली घेऊन हे उद्योग केले आहेत. ते ताबडतोब थांबवा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पोल पाडणार आहोत. याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची राहील. न विचारता ही काम केले आहेत त्याचे नुकसान देखील त्यांची जबाबदरी राहील. असे ग्राहक प्रबोधन समिती चे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya