ऐन अधिवेशनात एका मंत्र्यासह आमदाराला कोरोना

 

स्थैर्य, मुंबई, दि.७: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच राज्यमंत्री तनपुरे यांनी कोरोना रिपोर्टबद्दलची माहिती ट्विट केली. ‘कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असे राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ते तत्काळ माघारी फिरले. कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पुढील १० दिवस ते घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.