मशीदीत जाण्यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांना अटक; फक्त शांततेने नमाज अदा करण्यासाठी जात होतो -जलील

 

स्थैर्य, औरंगाबाद, दि. २: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. जलील यांना मशीदीत जाण्यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांनी मशीद उघडून नमाज अदा करण्याची घोषणा केली होती.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ ही बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. मात्र आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याचे म्हणाले होते. त्यांच्यासोबत नगरसेवक आणि मागच्या विधानसभा निवडणुकीतील एमआयएम उमेदवार नासेक सिद्दीकी सुद्धा होते, त्यांनाही अटक करून पोलिस घेऊन गेले आहेत. 

Previous Post Next Post