मराठा आरक्षण : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा पुढाकार

 


स्थैर्य, कोल्हापूर, दि.२३: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालून त्यावर तातडीने निर्णय द्यावा यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार खास. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असून लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मराठा समाजात त्याविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षणासाठी लक्ष द्यावे अशी विनंती करावी यासाठी दबाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यासंदर्भात पत्र देत आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya