मराठा आरक्षण : गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल; ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलने सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेत उडी घेतली आहे. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वत:च लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल,असा सल्ला त्यांनी दिला.

१ महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत मराठा आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत.

२ गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता न्यायालयात आहे.गरीब मराठ्यांनी आता श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya