माउली फाउंडेशनचे काम कौतुकास्पद : आमदार दीपक चव्हाण; माउली फाउंडेशन कडून फलटणकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

स्थैर्य, फलटण : प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे रुग्णवाहिका हस्तांतरित करताना आमदार दिपकराव चव्हाण व माउली फाउंडेशनचे पदाधिकारी.

स्थैर्य, फलटण : काळबादेवी, मुंबई येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने सुसज्ज अशी रूग्णवाहीका फलटणकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून फलटण नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. माउली फाउंडेशनच्या वतीने फलटणकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल माउली फाउंडेशनचे आभार मानत माउली फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून आगामी काळातही माउली फाउंडेशन विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत अशी खात्री आहे, असे मत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 


फलटण नगर परिषदेच्या आवारात माउली फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेली अँब्युलन्स प्रशाशनच्या स्वाधीन करण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, बाळासाहेब ननावरे, ऍड. रोहित अहिवळे, माउली फाउंडेशनचे ऍड. विश्वनाथ टाळकुटे व माउली फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


काळबादेवी, मुंबई येथील माऊली फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून आदिवासी भागासह अन्य भागात गरजूंना वैद्यकीय सेवा व इतर सामाजिक सेवा देण्याचे कार्य माऊली फाऊंडेशन मागील काही वर्षांपासून करत आहे. संस्थेच्या मालकीची एक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना सेवा दिली जाते. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रूग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात अधिक रूग्णवाहिकांची आवश्यकता असल्याचे समजल्याने आमच्या संस्थेच्या मालकीची रूग्णवाहिका क्र. MH OI CR 5159 आपल्या सेवेत देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. सदरची रूग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत वापरण्यास फलटण नगरपरिषदेस देत असल्याने वहानाचे इंधन, चालकांची नेमणूक व पगार व वाहनाची देखभाल दुरुस्ती आपल्या कडून करावयाची आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.