कोरोनाची साखळी तोडण्यासाठी म्हसवड शहरात जनता कर्फ्यु ची गरज - आ.गोरे

म्हसवड शहरात आयोजीत बैठकित बोलताना आ.जयकुमार गोरे.


स्थैर्य, म्हसवड दि.२ : म्हसवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असुन शहरातील बाधितांची संख्या ही १८० च्या वर पोहचलेली आहे, शहरातील ही वाढणारी कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यु ची गरज असुन यासाठी म्हसवड नगरपरिषद, आरोग्य विभाग व पोलीस स्टेशन ने पुढाकार घेवुन नागरीकांचे मनोबल वाढवावे व आणखी एक जनता कर्फ्यु शहरात सुरु करावा असे मत माणचे आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.


म्हसवड शहरातील कोरोना संक्रमण संदर्भात आयोजीत बैठकीत ते बोलत होते, यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मुख्याधिकारी सचिन माने,नगराध्यक्ष तुषार विरकर, नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कदम, स.पो.नि. गणेश वाघमोडे, डॉ. भारत काकडे, डॉ. मयुरी शेळके, माणदेशी चँम्पीयन चे प्रभात सिन्हा तलाठी आखडमल आदीजण उपस्थित होते.


पुढे बोलताना आ. गोरे म्हणाले की म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत असल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे या रुग्णांपैकी काहीजणांचा यामध्ये बळीही गेला असुन ही बाब खुपच गंभीर आहे रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी म्हसवड पालिका, आरोग्य विभागाने सामुहिक प्रयत्न करावे त्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी मात्र सर्व नागरीकांनी प्रशासनालाही तेवढेच सहकार्य करणे गरजेचे आहे, शहरातील कोरोना रुग्णांना जिल्ह्यात कोठेही बेड मिळत नसल्याची माहिती आपणाला समजल्यावरच मी मायणी येथील कोव्हीड सेंटर येथे ५० बेड वाढवण्याचे काम हाती घेतले असुन त्यापैकी २५ बेडचे काम वेगात सुरु आहे. असे जरी असले तरी सध्याचा काळ हा कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे. एकट्या म्हसवड शहरात हा आकडा दोनशेच्या उंबरट्यावर पोहचलेला आहे आणखी पुढील काही दिवसात हा आकडा वाढणार आहे त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत तो संपुर्ण परिसर सिल करुन त्या विभागातील प्रत्येक घरटी नागरीकांची रँपीड कोरोना टेस्ट करावी ही टेस्ट करताना पोलीसांनी त्या परिसरातील लोक बाहेर पडणार नाहीत यासाठी दक्ष राहवे रँपीड टेस्टमुळे शहरातील रुग्ण संख्या आणखी वाढणार असली तरी ती संख्या हळुहळु कमी होणार असुन एक दिवस शहर कोरोनामुक्त होईल यासाठी म्हसवडकर जनतेने जनता कर्फ्यु साठी तयारी ठेवावी व कडकडीत बंद पाळावा असे आवाहन शेवटी आ.गोरे यांनी केले.बाधितांची व त्यांच्या संपर्कातील लोकांची हिस्ट्री आरोग्य विभागाने नोंद करावी -

रँपीड कोरोना टेस्ट करण्यापुर्वी आरोग्य विभागाने शहरातील बाधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची हिस्ट्री तपासुन त्याची नोंद ठेवावी जेणेकरुन त्यांचीच प्राधान्याने रँपीड टेस्ट करण्यात आरोग्य विभागाला अडचण येणार नाही असे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी बैठकीत सांगितले.


जनता कर्फ्यु होत नसेल तर १४ दिवसांचा लॉकडाउन -

म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावीत म्हसवडकर जनतेशी संवाद साधुन त्यांना जनता कर्फ्यु साठी प्रोत्साहित करावे, जनता कर्फ्यु साठी जर नागरीकांची सहमती नसेल तर मात्र प्रशासनाने १४ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करावा असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.


माणदेशी चँम्पीयन कडुन रँपीड किट देणार -

शहरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कंन्टेटमेंट झोनमधील सर्व नागरीकांची कोरोना टेस्ट आरोग्य विभागातर्फे केली जाणार असुन त्यासाठी प्रत्येकाची रँपीड कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे, ही टेस्ट करण्यासाठी लागणारे रँपीड किट देण्याची व्यवस्था माणदेशी चँम्पीयन चे प्रमुख प्रभात सिन्हा यांनी केली आहे.


जनता कर्फ्यु अथवा लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडु नये

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यु अथवा लॉकडाउन सुरु करण्यात येणार्या असुन याच काळात प्रत्येकाची रँपीड कोरोना टेस्ट केली जाणार आहे त्यामुळे कोणीही घराबाहेर पडु नये याकाळात जो घराबाहेर पडेल त्याला पोलीसी प्रसाद दिला जाणार असल्याने कोणीही घराबाहेर न पडता नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन स.पो.नि. गणेश वाघमोडे यांनी केले.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.