मुंबईतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची साताऱ्यात सुटका - एलसीबीची कारवाई

 

स्थैर्य, सातारा, दि.२३: मुंबई येथून अल्पवयीन मुलीचे अहपरण करणार्‍या संशयिताला सातारा एलसीबीने जेरबंद करून मुलीचा सुटका केली. संशयीत मुलीला मालट्रकमध्ये बसून कोल्हापूरकडे जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून त्यास पकडले.  दिनेश परशुराम शिर्के वय 22 वर्षे रा. कुलुपवाडी इंदिरानगर बोरिवली पूर्व मुंबई असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, कस्तुरबा मार्ग (मंबई) येथील पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत त्या मुलीस घेवून सातारा परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने सातारा बसस्थानक, लॉजेस व परिसरामध्ये तसेच महामार्गावर शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महामार्गावर पेट्रोलींग करत असताना सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयीत व अल्पवयीन मुलगी कोल्हापुरकडे जाणार्‍या एक मालगाडीत बसून जाताना दिसून आले. पोलिसांनी लगेच संबंधित वाहनाचा पाठलाग करून सशंयीत आरोपीस ताब्यात घेतले व सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेवुन तिची सुटका केली. 

अपहृत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे बोरीवली पुर्व मुंबई यांचेकडील पथकाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील  यांच्या सुचना व मार्गदशनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, स. फौ. पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम वर्ग, पो.हवालदार दिपक मोरे, पो. ना. शरद बेबले, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, चालक संजय जाधव पो. ना. मोना निकम, राधा जगताप, तनुजा शेख आदींनी केली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya