मिसेस फडणवीसांचा खडसेंना टोला:'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे...' असे म्हणत अमृता फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर

 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या शाब्दीक वाद सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी थेट नाव घेत फडणवीसांवर आरोप लावले होते. यासोबतच त्यांनी अमृता फडणवीसांचाही उल्लेख करत निशाणा साधला होता. आता याला मिसेस फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले होते की, 'अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यावर पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?' असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. आता यावर अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नाही ! सर्वांचे भले होवो !' असे म्हणत अमृता फडणवीसांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

'एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? असा सवाल खडसेंनी केला होता. ते पुढे म्हणाले होते की, समजा अमृता फडणवीसजी यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असं होतें का? जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी म्हटले होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya