नगरपरिषदेने रेमडिसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावे : आमीर शेख

 

स्थैर्य, फलटण, दि.२८: सध्या फलटण शहरात व तालुक्यांमध्ये कोरोना आजाराने थैमान घातलेले आहे. कोरोना आपले रौद्ररूप फलटण शहरासह तालुक्यामध्ये दाखवत आहे. तरी फलटण शहरांमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांसाठी फलटण नगरपरिषदेने रेमडिसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी केलेली आहे.

फलटण नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून फलटण नगर परिषद ही विविध करांरूपे आपले कर संकलित करीत असते. तरी या संकलित करणाऱ्या विविध करांमधून फलटण नगरपरिषदेने रेमडिसिव्हर हे महागडे इंजेक्शन फलटण करांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावेत, असेही शेख यांनी स्पष्ट केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya