दारू पिताना मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन घालून केला खून

 


स्थैर्य, पुणे, दि. ३१ : पिंपरी चिंचवडमध्ये वारंवार गुन्ह्यांचे भयंकर प्रकार घडत आहेत. मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून डोक्यात बेसिन घालून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुभम साठे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .


काळेवाडी परिसरातील हॉटेल खुशबूच्या पाठीमागे काल मध्यरात्री ही घटना घडली. मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी शुभमचा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


कृष्णा भारत कापुरे, अजय मोहन क्षीरसागर आणि ज्ञानेश सुनील थोरात अशी तीन आरोपींची नावे आहेत. काल रात्री शुभम आणि त्याचे मित्र पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता तिघांनी शुभमच्या डोक्यात बेसिन घातले. यामध्ये शुभमचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून शुभमचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


Previous Post Next Post