बिहारमध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येईल : फडणवीस

 

स्थैर्य, मुंबई, दि.२५: बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे भाजपा प्रभारी महाराष्ट्राचे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा आशावाद व्यक्त केला. 

जगात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. बिहारच्या नागरिकांची मोदींवर श्रद्धा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी लोकांसाठी काम केलंय. त्यामुळे, बिहारमध्ये पुन्हा एकदा एडीएचं सरकार निवडून येईल, असे फडणवीस यांनी म्हटले. बिहार निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी विजयी आशावाद व्यक्त केला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya