सुशांत प्रकरणात नवीन दावा:दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूतने केला होता एका वकिलाला संपर्क, सीबीआय शोधतेय या दोन्ही केसमधील धागे-दोरे

 

स्थैर्य, मुंबई, दि.८: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, 8 जून रोजी माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूनंतर सुशांतने एका वकिलांशी संपर्क साधला होता. दिशाच्या मृत्यूच्या दिवशीच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती त्याचे घर सोडून आपल्या घरी निघून गेली होती. यानंतर लगेचच सुशांतने वकिलाला संपर्क केला होता, पण यामागचे कारण समजू शकलेले नाही.

8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीने सीबीआय तपास कर आहे. पण दोघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

दिशाच्या निधनानंतर सुशांतची प्रकृती खालावली

दिशा सुशांतची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यूनंतर सुशांतची प्रकृती आणखीनच खालावली होती आणि त्याने औषध घेणे बंद केले होते, असे सांगितले जाते.

सुशांत गुगलवर त्याच्या नावाचे लेख शोधत असे

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मृत्यूपूर्वी सुशांत सतत गुगलवर आपल्याबाबत कुठली नकारात्मक बातमी आली आहे का? याचा शोध घेत असे. इतकेच नाही तर तो पेनलेस डेथ (वेदनारहित मृत्यू), स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर या सारख्या आजारांविषयी सर्चिंग करायचा.

दिशा प्रकरणात अडकण्याची वाटत होती सुशांतला भीती

25 जुलै रोजी सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यातील राजीव नगर येथे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला वाटत होती, असे त्यांनी तक्रारीत म्हटले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya