कोविड रुग्णालय सुरू करावयाच्या कामांची ना. देसाईंनी केली पहाणी

 


स्थैर्य, दौलतनगर, दि. 5 : पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड व सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे 8 दिवसापूर्वीच बैठक घेवून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी 8 दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनसह 35 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून तालुका प्रशासनातील अधि-कार्‍यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार ढेबेवाडी येथे कोविड रुग्णालय सुरू करावयाच्या कामांची ना. शंभूराज देसाईंनी संबंधित अधिकार्‍यांना सोबत घेत प्रत्यक्ष  पहाणी केली.

यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, ढेबेवाडीचे स.पो.नि. उत्तम भजनावळे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विद्याधर शिंदे उपस्थित होते.


ना. देसाई म्हणाले, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजनसह 35 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.


येत्या 8 दिवसात या कोविड रुग्णालयाचे काम पूर्ण करून या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणार्‍या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. येत्या 8 दिवसात पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील, अशी मला आशा आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.