राजकारणविरहित नातेसंबंध हे नवसमाज घडविण्यास वृंद्धीगत होत असते : विजयकुमार काटवटे

 अयोध्या फौंडेशन'चा स्तुत्य उपक्रम

कोरोना योद्धा पुरस्कार अनिल वीर यांना प्रदान करताना विजयकुमार काटवटे शेजारी मान्यवर-कार्यकर्ते.

स्थैर्य, सातारा, दि. ३: राजकारण २० टक्के व समाजकारण ८० टक्के केले पाहिजे.या न्यायाने निवडणुकांपूरते राजकारण असावे. सर्वांगसुंदर समाज निर्माण करण्यासाठी राजकारणविरहित नातेसंबंध नवसमाज घडविण्यास वृंद्धीगत होत असते.असे प्रतिपादन जिल्हा भाजपा'चे उपाध्यक्ष,फौंडेशन'चे सर्वेसर्वा नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी केले.

विविध क्षेत्रात सामाजिक भावनेने कार्यरत असणारे पत्रकार बंधुत्व प्रतिष्ठान'चे संस्थापक अनिल वीर यांना कोरोना योद्धा पुरस्कार काटवटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जितेंद्र घोरपडे होते.यावेळी सौ.स्वाती देशपांडे, प्रशांत जाधव,प्रवीण बिभारे, निलेश खुर्द आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयकुमार काटवटे म्हणाले, प्रत्येकांनी आपला धर्म,राजकीय पक्ष आदींबाबत मनापासून काम करावे.मात्र,जे विधायक कार्य करीत असेल त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कुविचाराने/कोरोनाविचाराने प्रेरित झालेले काहीजण विकास कामात अडथळा आणत आहेत.तेव्हा विशालभावनेने एकसंघ होऊन शहराचा चेहरामोहरा बदलुन टाकूया.

"आयुष्यात अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु, कोरोनाच्या महामारीमध्ये कोरोना योद्धा पुरस्कार सलग ३ वेळा मिळाल्याने मी धन्य झालो आहे. तेव्हा सदरचा पुरस्कार पत्रकारासह नेते, प्रशासन, डॉक्टर,नर्स,पोलीस आदी वीर योद्ध्यांप्रमाणे लढणाऱ्या समाजातील सर्व घटकांना समर्पित करीत आहे."असे विचार अनिल वीर यांनी व्यक्त केले.अयोध्या फौंडेशनने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून शहराला आगळी वेगळी ओळख करून दिली आहे.खऱ्या अर्थाने स्तुत्य असे उपक्रम राबवत आहेत.तेव्हा इतर लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा.
राजाराम तारळेकर यांनी स्वागत केले.रमेश पितळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.कु.गौरी देशपांडे यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील पदादीकारी,कार्यकर्ते ,नागरिक,युवक-युवती व बालगोपाळ उपस्थित होते.

पुरस्काराची हॅटट्रिक- कोरोना योद्धा पुरस्कार महाराष्ट्र युवा संघर्ष संस्थेच्यावतीने प्रथमतः अनिल वीर यांना मिळाला होता.तदनंतर प्राचार्य एस.एम.शेख यांच्या हस्ते अनंत'च्या मंचा'वर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला होता.तिसऱ्यावेळी काटवटे यांनी दिल्याने आपोआपच हॅटट्रिक साधली आहे.
Attachments area
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.