आता मुंबईला म्हटले पाकिस्तान:कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; ट्विट करून म्हणाली - ते माझ्यासाठी राम मंदिर होते, बाबर आणि आर्मीने माझ्या मंदिराची तोडफोड केली! जयश्री रामच्या घोषणा...

 स्थैर्य, मुंबई, दि.९: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली आहे. बीएमसीने तिचे ऑफिस अवैध बांधकाम असल्याची 24 तासांत तिला दुसरी नोटीस पाठवली होती.

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. दरम्यान तिच्या मुंबईस्थित घराबाहेर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

...म्हणूनच माझी मुंबईत आता पीओके झाली आहे.

कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीकडून तोडफोड सुरू करण्यात आली. यानंतर कंगनाने ट्विट केले. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले.

मी कधीच चुकीची नव्हते. माझे शत्रू वारंवार सिद्ध करत असतात की, माझी मुंबईत आता पीओके झाली आहे, असे ट्विट कंगनाने केले.


हे मंदिर पुन्हा बनवले जाईल - कंगना

कंगनाने ट्विट करत म्हटले की, 'मणिकर्णिका फिल्म्जमध्ये पहिली फिल्म अयोध्याची घोषणा झाली, ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिर आहे, आज येथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेल. राम मंदिर तोडले जाईल. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनवले जाईल, हे मंदिर पुन्हा बनवले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम...'

पुन्हा बनवले जाईल, हे मंदिर पुन्हा बनवले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम...'

कंगनाने नंतर थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला आहे.

कंगनाने मुंबईला रवाना होण्यापूर्वी देखील एक ट्विट केले होते.

कंगनाच्या अडचणीत सातत्याने होतेय वाढ

दरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून मंगळवारी नोटीस पाठवण्यात आली आणि आज तिच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


शिवसेनेने आज पुन्हा कंगनासाठी अपशब्दांचा वापर केला

शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा कंगनावर टीका केली आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा या प्रकरणावरून टीका केली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya