लोणंद ग्रामस्थांच्यावतीने तुळशी वृंदावन धरणाचे ओटीभरण

 


स्थैर्य, लोणंद, दि. 25 : लोणंद व खेड बुद्रुक गावाच्या सीमेवर असणारे तुळशी वृंदावन धरण पूर्ण क्षमतेने  भरले असून धरणातील पाण्याचे पूजन लोणंद ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने खेड बुद्रुक व लोणंद गावातील शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.


यावेळी खंडाळा तालुका पाणी पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान,  लोणंद टिंबर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शामसुंदर डोईफोडे, नगरसेविका शैलजा खरात, स्वाती भंडलकर, रमेश कर्णवर, मस्कू शेळके, शरद भंडलकर, विशाल शेळके, सर्फराज बागवान, शरद भंडलकर व इकबाल बागवान उपस्थित होते.


खेड बुद्रुक येथील तुळशी वृंदावन धरण  मेघराजाच्या कृपेने या वर्षी भरले असून  लोणंद व परिसरातील दगड वस्ती, बंडगरवस्ती, बिरोबा वस्ती, पांढरे मळा, पाटील मळा आदी भागातील शेतकर्‍यांच्या शेतीला आगामी वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे.Previous Post Next Post