प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वयोवृध्द पती पत्नीची कोरोनावर मात

 


योगसाधना व स्वयप्रेरणाचे महत्व, कैतुकाचा वर्षाव


स्थैर्य, सातारा, दि. २५ : कोरोना महामारी विषाणूमुळे संपूर्ण समाजबांधव आज चितेंत आहे दररोज बांधीत व मूत्युमुखी पडणार्‍याची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे त्यामुळे सर्वचस्तरावर सध्या भितीचे वातावरण पसरले आहे या विषाणूवर मात करण्यासाठी सर्वच घटक विशेषता वैद्यकिय क्षेत्रातील सर्व घटक दिवसरात्र परिश्रम घेत आहेत यामधून अनेकाना बरे करण्यात यश हि या यंत्रणेला येत आहे हे जरी खरे असले तरी सभोवतालच्या वातारवरणाचा परिणाम हा समाजजीवनावर घडत आहे अशा कठीण प्रसंगी आज ऐकामेकाना आधार व प्रेम देण्याची नितात गरज निर्माण झाली आहे भयभीत समाजघटक हा मानसिक दुष्टाया खचत चालला आहे हे समाजाचे वास्तव रुप आज सर्वत्र पहिला मिळते कोरोना आजाराचे स्वस्थ विस्तार व त्याचे गांर्भीय पाहाता एखादया रग्नाला कोरोना बांधीत म्हटले कि त्यास समोर मूत्यूच्या दरवाजाची आठवण होते हे त्रिवार सत्य आहे भयभीतच्या पाठीमागे नेहमीच मूत्युचा धाव लागते हे मात्र निशिष्तच परंतू असे हि काही समाजघटकामध्ये समाजघटक असतात ते आलेल्या मूत्युवर विजय प्राप्त करतात असेचे काहीसे सातारा जिल्हातील खटाव गावातील बुध येथे राहणारे शिवाजीराव जगताप व त्याची धर्मपत्नी पार्वती जगताप यांनी कोरोना महामारी संकटाशी यशस्वी मुकाबल करीत त्यावर मात केली आहे याविषयी श्रीरंग काटेकर याचा विशेष लेख..


शिवाजीराव जगताप हे हाडाचे शिक्षक मोठया जिद्दीने वय वर्ष 90 तर त्याची धर्मपत्नी पार्वती जगताप वय वर्ष 80 या दोधानाही काही दिवसापूर्वी कोरोनाची बांधा झाली परंतू हे जोडपे भयभीत न होता हॉस्पीटलमध्ये स्वताला दाखल करुन घेतले 5 दिवस हॉस्पीटल मधील औषधउपचार करुन त्यांनी स्वताच्या जबाबदारीवर हॉस्पीटलमधून डिस्चार्च घेतला शरीरातील वयोमानानुसार असलेला थकवा व आजाराचे दडपण झुगारुन या वयोवृध्दाने निसर्गाच्या सनिध्यात विलगीकरणाचा निर्णय घेतला गौरीशंकर देगाव कॉम्पसमधील वस्तीगुहात स्वताला विलगीकरण करुन घेतले या दरम्यान निर्सगातील मोकळी व स्वच्छ हावा याचा सकारत्मक परिणाम त्याच्या शरीरावर होवू लागला कोरोनाचे दडपण या ठिकाणी क्षणात दूर झणल्याने मनावारल दडपण हि दूर झाले त्यामुळे या आजाराची भितीची सावट पूर्णपणे दूर झाली वयोवृध्द शिवाजीराव व पत्नी पार्वती यांनी दररोज औषधउपचाराबरोबरच दोन तास योगसाधना केल्याने याचा सकारत्मक परिणाम त्याच्या ओराग्यवर दिसून आला अल्पकाळात त्यामुळे या गंभीर आजारावर या वयोवृध्द जोढप्यानी मात केली आज शिवाजीराव 90 वर्षाचे व पत्नी 80 वर्षाचीी आहे परंतू दोघे हि पूर्णपणे ठणठणीत झाल्याचे दिसून येते कोरोनाच्या भितीमुळे आज सर्वत्र भयभित वातावरण असताना या वयोवृध्दानी कोरोनावर केलेली मात समाजघटकासाठी स्फुर्तीदायक ठरत आहे योगसाधनेचे महत्व व त्याची उपयुक्तात हे आज यामधून अनुभवला मिळाले अशक्य ते शक्य करण्याची किमया प्राचीन भारतीय संस्कृतीच्या योगसाधनेत आहे हे पुन्हा शिवाजीराव जगताप व पार्वती जगताप यांनी कृमीतून सिध्द केले आज समाजबांधवाना आधार देण्याची खरी गरज असल्याचे शिवाजीराव जगताप याचे मत आहे आलेल्या संकटाना खचू नका धीर धरा ऐकामेकाना आधा देवून आत्मविश्वास वाढवावा कोरोनावर मात करण्याचा हाच ऐकमेव मंत्र आहे कोरेाना नक्की बरा होतो आपली स्वयप्रेरणा फक्त जागृत करा आज याचीच खरी गरज आहे वयोवृध्द असून हि त्याच्यातील जिद्द पाहून त्याना सलामच करावासा वाटतो कोरोना आजाराला बरे झाल्याने कळताच खटाव व बुध पंचक्रोशातून शिवाजीराव जगताप व पत्नी पार्वती जगताप अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव करण्यात आला गौरीशंकरचे चेअरमन मदनराव जगताप याचे ते आर्इ वडील आहेत त्याचा नुकताच गौरीशंकर देगाव कॉम्पसमध्ये सत्कार करण्यात आला. 


जीवनात येणार्‍या संकटाना नेहमीच सकारत्मक दुष्टीकोन ठेवून सामोरे गेल्यास दुख यातना व मनस्वी त्रास वाटयाल येत नाही जीवनाशी निगडीत असणार्‍या घटना आयुष्यात घडत असतात त्यास धैर्याने समोरे जाणे ऐवढेच आपल्या हाती आहे या काळात मनशांती ध्याससाधना व योगसाधना हेच खरेतर कामी येत असल्याचे विज्ञानाने सिध्द केले आहे हिच खरी आपली जीवनशैली आहे हे पुन्हा एखादा गंभीर आजारावर मात करीत शिवाजीराव जगताप व त्याची पत्नी पार्वती जगताप यांनी कृतीतून सिध्द करुन दाखविले आहे.  

श्रीरंग काटेकर सातारा


 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya