फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण कोरोना बाधित


स्थैर्य, फलटण : येथील शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. नुकताच म्हणजेच काल प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्या नंतर आज फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तरी गत आठवड्यात पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या संपर्कात आलेल्या सर्वानी गृह विलीगीकरण करावे व स्थानिक प्रशाशन म्हणजेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत येथील अधिकाऱ्यांना सांगून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी केलेले आहे.

Previous Post Next Post