पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यात १५० झाडांचे वृक्षारोपण


स्थैर्य, फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. आदर्की येथे भाजपचे सरचिटणीस सुरेश निंबाळकर यांच्या सहकार्याने १५० झाडांचे वृक्षारोपण माध्यमिक विद्यालय मध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनोज कलापट यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. आदर्की येथील शाळेच्या समोर १५० विविध प्रकारचे झाडे लावून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व वृक्षारोपणाचे महत्व जनतेला कळावे यासाठी हा सोहळा संपन्न झाला. 


तसेच गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध उपक्रम राबवून फलटण तालुक्यात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फलटण तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, फलटणचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, कोरेगाव तालुका किसान मोर्चा उपाध्यक्ष सचिन जाधव, आदर्की खु.चे उपसरपंच दत्तू कांबळे, उद्योजक आघाडीचे सचिन राक्षे, नवल जाधव व ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya