साताऱ्यातील बुधवार नाक्यावरील वॉशिंग सेंटरलगत भरणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 


स्थैर्य, सातारा, दि.२४: साताऱ्यातील बुधवार नाक्यावरील वॉशिंग सेंटरलगत भरणाऱ्या  जुगार अड्ड्यावर आरपीएस समीर शेख व शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकून सात जणांविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्रात गुन्हा दाखल झाला आहेे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 1 लाख 5 हजार रुपरे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांमध्ये नगरसेविकेच्या मुलाचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रवीण उर्फ गोट्या दत्तात्रर जगताप (वर 27, रा.प्रतापगंज पेठ), जतिन संजर वाघमारे (वर 27, रा. बुधवार पेठ), अमर शंकर आवळे (रा. बुधवार नाका), किरण अनिल कुर्हाडे (रा. करंजे पेठ), संजर तानाजी भिसे (वर 29, रा. शाहूनगर), वासूदेव शिवाजी जांभळे (वर 30), रोशन चंद्रकांत जगताप (वर 22, दोघे रा. दूधी, ता. कोरेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेेत. याप्रकरणी पोलिस हवालदार ओमकार यादव रांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील दि. 22 रोजी बुधवार नाका रेथे जुगार अड्डा सुरु असल्राने आरपीएस समीर शेख रांनी शाहूपुरी पोलिसांचे पथक तरार करुन छापा टाकला. छापा पडल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली. संशयितांनी पळून जाण्राचा प्रयत्न करताच पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याठिकाणी रोख रक्कम, स्लिपबुक, मोबाईल, दुचाकी, पेन असा तब्बल 1 लाख 4 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya