मा.आ.प्रभाकर घार्गे यांच्यावतीने वडूजच्या कोव्हीड सेंटरला दहा ऑक्सिजन सिलेंडरची भेट : १७ खासगी वैद्यकीय व्यवसायीक देणार योगदान

 

वडूज: येथील ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरला मा.आ.प्रभाकर घार्गे यांच्यावतीने दहा जम्बो ऑक्सिजन सिलींडर भेट देताना सचिन माळी, जयवंत गोडसे, संदिप गोडसे व इतर.

स्थैर्य, वडूज, दि.२५: येथील ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरला माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दहा जम्बो ऑक्सिजन सिलींडर भेट दिले. मजूर फेडरेशनचे संचालक सचिन माळी, राजेंद्र चव्हाण,स्विकृत नगरसेवक संदिप किसन गोडसे, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी जयवंत गोडसे, संभाजी इंगळे यांच्या हस्ते ते रूग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अधिक्षक डॉ. अशोक माने, डॉ. अशोकराव तासगावकर, डॉ. समीर तांबोळी, उपस्थित होते. श्री. घार्गे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी ग्रामीण रूग्णालयात अकरा ऑक्सिजन मशिन भेट दिले होते. त्यानंतर आता सिलींडरचा तुटवडा आहे हे लक्षात येताच त्यांनी दहा जम्बो सिलींडर भेट दिले. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरात कौतुक होत आहे. सतरा वैद्यकीय व्यवसायिकांचे योगदान वडूज कोव्हीड सेंटरला शहरातील सतरा खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी एकत्र येऊन दहा नविन बेड भेट देण्याबरोबर सेवेचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डॉ. बी.जे.काटकर, डॉ. सौ. शुभांगी काटकर, डॉ. अजित इनामदार, डॉ. व्ही.पी.देशमुख, डॉ. एस. डी. कुंभार, डॉ. शिला कुंभार, डॉ.संतोष देशमुख, डॉ.डी.व्ही.खाडे, डॉ. शशिकांत लंगडे, डॉ. महेश काटकर, डॉ. बर्गे, डॉ. तासगावकर, डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. अभिजीत जाधव, डॉ. राजेश देवकर, डॉ. अकबर काझी, डॉ. सोमनाथ काळे, यांचा समावेश आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya