राजकुमार पाटील यांचे कोरोनामुळे निधन

 


स्थैर्य, दि. 25 : दैनिक पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे उपसंपादक, रामबाग येथील रहिवासी राजकुमार माणीकराव पाटील यांचे कोरोनामुळे आज शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी ( २६ सप्टेंबर) मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. ते उपचाराला प्रतिसाद देत होते. मात्र, उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या धक्क््याने त्यांचे निधन झाले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya