पाटील हॉस्पिटलच्या सहकार्याने 'राधिका पॅलेस' मध्ये प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर

 

स्थैर्य, सातारा, दि.१५: आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा खर झालेला आहे. अशावेळी कोरोनाग्र्स्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. हि गरज ओळखून सातारकरांच्या सोयी करिता हॉटेल राधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरु केले आहे. ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल ९४ पेक्षा जास्ती आहे, ज्यांचे वय १० ते ६० आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा असिमटेमेटिक रुग्णांसाठी हे प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर सुरु केले आहे. 

या सेंटर मध्ये एकूण ६० बेड्स ची व्यवस्था केलेली असून डॉक्टरांचे निरीक्षण, जेवण , रहाण्याची सोय इत्यादि गोष्टींची देखील सोय करण्यात आलेली आहे. डॉ. रमेश पाटील, डॉ.आदिश पाटील व डॉ. ओंकार पाटील यांनी स्वतः लक्ष घालून हे सेंटर सुरु केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीदेखील या सेंटर ला त्वरित मान्यता दिली व सेंटर कसे असावे यासाठी मार्गदर्शन केले. त्याबद्दल डॉ. पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

हॉटेल राधिका पॅलेस गेली २८ वर्षे सातारकरांच्या सेवेत असून, आता संकटाच्या काळातही तुमच्या सोबत आहे. हे प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर असल्याने सरकारी मार्गदर्शनाप्रमाणे रुग्णांकडून पेमेंट घेतले जाणार आहे. ज्या रुग्णांना अशा व्यवस्थेची गरज असेल त्यांनी पाटील हॉस्पिटल, कोरेगाव यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८८१६२२७५३ किंवा ०२१६२ - २३३१३३ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.