फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर त्वरित नेमणूक करा; आमदार दीपक चव्हाण यांच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांची त्वरित ॲक्शन

स्थैर्य, फलटण : येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आढावा घेताना आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, डॉ. व्यंकट धवन, डॉ. सुभाष गायकवाड. 

स्थैर्य, फलटण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर त्वरित नेमणुका होणेबाबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्वरित ॲक्शन घेत फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असणारी रिक्त पदांवर त्वरित नेमणुका करण्याबाबत आदेश संबंधित विभागात निर्गमित केलेले आहेत.


फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. यामध्ये फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व पदे भरलेली असावीत व कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार आमदार दीपक चव्हाण यांनी काल (दि. ३) रोजी समक्ष फलटण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून तेथे असणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली.


आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रिक्त पदांबाबत काल (दि. ३) रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालय येथे असणाऱ्या कोरोना रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध रिक्त पदे असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांच्या निदर्शनास आले. तेथील रिक्त पदे त्वरित मंजूर करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आमदार दीपक चव्हाण यांच्याकडे केली. 


आमदार दीपक चव्हाण यांनी त्वरित जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सदरील बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व पदांवर तातडीने नेमणुका करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागात निर्गमित केलेले आहेत.


फलटण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, जीएनएम, वॉर्डबॉय, पब्लिक रिलेशन ऑफिसर यासह विविध पदे रिक्त होती. आमदार दीपक चव्हाण यांच्या मागणीमुळे सदरील पदांवर लवकरात लवकर नेमणुका होतील असे आश्‍वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आमदार दीपक चव्हाण यांना दिलेले आहे.


फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन सिलेंडर वेळेमध्ये भरून देण्यात यावेत व अक्सिडेंट सिलेंडरचा जादाचा साठा फलटण येथे करून ठेवावा. अशी मागणीही आमदार दीपक चव्हाण यांनी जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केलेली आहे. याबाबतही त्वरित पुढील कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित विभागात दिलेली आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya