डोळ्यात चटणीपूड टाकून काठीने मारहाण

 

स्थैर्य, सातारा, दि.२०: वेळे-कामथी, ता. सातारा येथे एकास गुरे जोरात जावू दे म्हंटल्याच्या कारणावरून एकाच्या डोळ्यात चटणीपूड टाकून काठीने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारुती बाळा चव्हाण रा. जोतिबाची वाडी, ता. सातारा याच्यावर गुन्हा दाखल ढाला आहे. मारुती चव्हाण याला बजरंग बाबुराव चव्हाण हे गुरे जोरात जावू दे म्हटले. या कारणावरून मारुती चव्हाणने त्यांना काठीने डोक्यात व पायावर मारहाण करून डोळ्यात चटणीपूड टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.