प्रा. अजय शेटे यांची खटाव तालुकाध्यक्षपदी निवड

 


स्थैर्य, कातरखटाव, दि. ०४ : वडूज (ता. खटाव ) येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्यु. कॉलेजमधील प्रा. अजय वसंतराव शेटे यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार, प्रसार अभियान समितीच्या खटाव तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. समितीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर यांच्या शिफारशीनुसार अजय शेटे यांची निवड झाली आहे. प्रा. शेटे हे जनसंघाचे दिवंगत नेते कै. वसंतराव शेटे यांचे सुपुत्र आहेत. लहानपणापासूनच ते संघाच्या मुशीत तयार झाले असून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक अभियानात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. या निवडीबद्दल त्यांचे ग्राहक पंचायतीचे संभाजीराव इंगळे, किसनराव गोडसे, बाळासाहेब पाटील, सुयोग शेटे आदिंसह मान्यवर पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर बोलताना प्रा. शेटे म्हणाले, आत्तापर्यंत पक्षासाठी निष्ठेने केलेल्या कार्याची पोहोच पावती या निवडीने मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या तळागळातील लोकांच्या विकासासाठी अनेक वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा प्रसार गावोगावी करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.